‘तारक मेहता का’मालिकेमध्ये दया परतणार

dayaben
मुंबई| Last Modified बुधवार, 8 जून 2022 (15:11 IST)
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या लाखो चाहत्यांसाठी खुषखबर आहे. या मालिकेतील अतिशय लोकप्रिय पात्र दया बेन हिचे पुनरागमन होणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी त्याचा प्रोमो प्रसिद्ध केला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दया बेन परतणार याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर आता दया परतणार आहे. विशेष म्हणजे, मालिकेतील पात्र जेठालालच्या नव्या दुकानाच्या शुभारंभप्रसंगी दया ची भेट प्रेक्षकांना होणार आहे.

मालिकेतील तारक मेहताची भूमिका करणारे कलाकार शैलेश लोढा यांनी मालिका सोडली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा झटका बसला. आणि आता ‘तारक मेहता’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. शोमधील प्रसिद्ध पात्र दया बेन पुनरागमन करीत आहे. बऱ्याच दिवसांपासून दया बेन च्या पुनरागमनाबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते. मात्र चाहत्यांना पुन्हा निराश व्हावे लागले होते. ‘तारक मेहता’मध्ये जेठालाल आणि दया यांची जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
असित मोदी यांनी सांगितले की, कोणत्याही चांगल्या वेळी दया बेनला प्रेक्षकांसमोर आणले जाईल. ‘आमच्याकडे दया बेनचे पात्र परत न आणण्याचे कोणतेही कारण नाही. मागील काही काळ आपल्या सर्वांसाठी कठीण गेले आहेत. आता परिस्थिती थोडी चांगली झाली आहे. सन 2022 मध्ये कोणत्याही चांगल्या वेळी आम्ही दया बेनचे पात्र परत आणणार आहोत. जेठालाल आणि दया भाभी यांचे मनोरंजन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आणि आता दया बेन परतणार असल्याचा प्रोमो प्रसारीत करण्यात आला आहे.
या मालिकेतील दया बेन चे पात्र अभिनेत्री दिशा वाकाणी या साकारत होत्या. दिशा वाकाणी हिने मॅटर्निटी लिव्ह घेतली होती. तीला आता दोन मुले आहेत. दुसऱ्या अपत्याला तिने काही दिवसांपूर्वीच जन्म दिला आहे. त्यामुळे दया चे पात्र साकारण्यासाठी दिशा वाकाणी परतण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. परिणामी, हे अतिशय लोकप्रिय पात्र दुसरीच अभिनेत्री साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचा खुलासा मालिकेत आता लवकरच होणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

John Abraham :जॉन अब्राहमने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली

John Abraham :जॉन अब्राहमने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याच्या पुढील ...

Dwarkadhish Temple Dwarka द्वारकाधीश मंदिर द्वारका

Dwarkadhish Temple Dwarka द्वारकाधीश मंदिर द्वारका
द्वारकाधीश मंदिर गुजरात राज्यातील द्वारका या पवित्र शहरात गोमती नदीच्या काठावर आहे. ...

बिपाशा बसूने बोल्ड स्टाईलमध्ये प्रेग्नन्सीची घोषणा केली, ...

बिपाशा बसूने बोल्ड स्टाईलमध्ये प्रेग्नन्सीची घोषणा केली, वयाच्या 43 व्या वर्षी होणार आई
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूने सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली ...

GHE DABBAL-30सप्टेंबरला उडणार ‘घे डबल’चा धमाका! भाऊ कदम ...

GHE DABBAL-30सप्टेंबरला उडणार ‘घे डबल’चा धमाका! भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेत !!!
मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचे लवकरच आगमन होणार आहे. आणि या चित्रपटाचे ...

साखर कुठून मिळते ?

साखर कुठून मिळते ?
शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं? मन्या : माहीत नाही.