बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

फॅशन मॅगजीन मॅक्सीमकडून दिपीका 'हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर'

दिपीका पादुकोण 'हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर' ठरली आहे. फॅशन मॅगजीन मॅक्सीमने दीपिकाला हा किताब दिला आहे.  प्रसिद्ध फॅशन मॅगजीन मॅक्सीमने 100 हॉट वुमेन्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्रा या दोघींनी स्थान मिळवलं आहे. हार्ले बाल्डबीन, इम्मा वॉट्सन, इम्मा स्टोन, दकोता जॉन्सन आणि केन्डल जेनर या अभिनेत्रींचासुद्धा मॅक्सीमच्या यादीत समावेश आहे.  'हॉटेस्ट वुमन ऑफ द इयर' ठरवण्यासाठी मॅक्मीमने एक सर्व्हे केला होता आणि प्रेक्षकांना वोट करायला सांगितलं होतं. यामध्ये दीपिकाच्या लाखो चाहत्यांनी तीला मतदान करून पहिल्या स्थानावर आणलं. मॅक्सीमने खास कॅप्शनसह व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.  दिपिकाने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मॅक्सीमच्या कव्हर पेजचा फोटो शेअर केला आहे. यात 'हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर' म्हणून घोषीत करण्याचं तीने सांगितलं आहे. या फोटोमध्ये दीपिकाने आकर्षक अशी पोज दिली असून दिपीकाचा हॉट अंदाज बघायला मिळतो आहे.