मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (18:45 IST)

दीपिका पदुकोण-रणवीर सिंग प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-वडील होणार आहेत. हे जोडपे त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. आता ती शुभ वेळ आली आहे, जेव्हा चाहत्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. 

अभिनेत्री दीपिका पदुकोण आज शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी तिची आई उज्जला पदुकोण आणि पती रणवीर सिंग यांच्यासोबत मुंबईतील रुग्णालयात पोहोचली तेव्हा तिला पापाराझींनी पाहिले. बाळाच्या आगमनापूर्वी, रणवीर आणि दीपिका त्यांच्या आलिशान कारमधून मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचताना दिसले.

हे दृश्य पाहून चाहते म्हणतात की आता या जोडप्याचे अभिनंदन करण्याची वेळ आली आहे.दीपिका याच महिन्यांत  आपल्या पहिल्या अपत्याची आतुरतेने वाट बघत आहे. अलीकडेच रणवीर आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाताना दिसला.
 
त्यांचा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, दीपिका रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली आहे की ती कोणत्याही दिवशी गोड बातमी देणार आहे, हे अद्याप स्पष्ट झाले  नाही.
Edited by - Priya Dixit