बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (13:47 IST)

दीपिकाला जेंडर केज नंतर का नाही मिळाले हॉलिवूड प्रोजेक्ट

बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण हिनं 2017 मध्ये डेब्यू केला होता. हॉलिवूड स्टार विन डिजल सोबत तिनं जेंडर केज या सिनेमात काम केलं. दीपिका आणि प्रियंका चोपडा या दोन्ही अभिनेत्रींनी एका वर्षाआधी हॉलिवूडमध्ये सुरुवात केली आहे. प्रियंका मात्र एकापाठोपाठ एक सिनेमा करताना दिसत आहे, परंतु दीपिका मात्र जेंडर केज नंतर एकाही हॉलिवूड सिनेमात दिसली नाही. एका मुलाखतीत दीपिकाला विचारण्यात आलं की, तू हॉलिवूड सिनेमात का दिसत नाहीस. यावर दीपिका म्हणाली, 'सिनेमांना इंटरनॅशनल किंवा इंडियन असं मी अजिबात पाहात नाही. सिनेमा भावना मांडण्याचं एक माध्यम आहे.
 
हा चान्स देशाच्या बाहेरून येत असेल तर ठीक आहे.' दीपिकानं सांगितलं की, हॉलिवूडच्या नाही तर देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातून तिला चांगलं काम ऑफर झालं तर ती नक्की ते काम करेल. दीपिका म्हणते, मी जेंडर केज सिनेमा यासाठी केला होता कारण त्यात एक दमदार रोल मला मिळाला होता.