बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (16:19 IST)

'त्या' फोटोमुळे दीपिका पदुकोणला ट्रोलिंग

सोशल मीडियावर दीपिका पदुकोणला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.  कारण  कमी  वस्त्रांमध्ये काढलेला फोटो  दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच एका फोटोमुळे चाहते चांगलेच खवळले आहेत. दीपिकाचा उद्धार करणारे कमेंट्स पोस्ट करुन नेटिझन्सनी आपला राग व्यक्त केला आहे. 'दीपिका आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, भारतीय संस्कृतीची लाज राख, हॉलिवूडला जाऊन तुला संस्कारांचा विसर पडला का, आम्हाला तुझी लाज वाटते, तुझा धिक्कार असो’ अशा कमेंट्स केल्या आहेत. विशेष  म्हणजे  या कमेंट्सकडे दीपिकाने कानाडोळा केला आहे. उलट त्याच फोटोशूटमधील आणखी एक फोटो शेअर करुन ‘कमेंटखोरां’ना उत्तर दिले आहे.