देवो के देव महादेव फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया अडकली लग्न बंधनात
सध्या सिने विश्वात लग्न सराय हंगाम सुरु आहे. आता देवो के देव महादेव फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया उद्योगपती विकास पराशरशी रविवारी 18 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकली आहे. सोनारिकाने लग्नासाठी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर विकास याने सूट घातला होता.
या लग्नसोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोनारिकाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर सोनारिकाने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले असून तिने इश्क मी मरजावा, दास्तान ए मोहब्बत, तुम देना साथ मेरा , या मालिकेत काम केलं आहे. तिला देवो के देव महादेव या
मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने पार्वतीची भूमिका साकारली होती.
Edited by - Priya Dixit