गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (17:59 IST)

धक धक गर्ल माधुरी दीक्षित आता ओटीटी वर,या मोठ्या बॅनर ने करणार पदार्पण

सध्या OTTप्लॅटफॉर्मची मागणी वाढली आहे.वर्ष 2020 मध्ये बॉलिवूडचे अनेक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले गेले तर बडे मोठे सेलेब्स OTTकडे वळले.आता या यादीत हिंदी चित्रपटाची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी सर्वांची लाडकी माधुरी दीक्षित नेने देखील सामील होत आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार करण जोहर डिजिटल कंटेंट प्रॉडक्शन कंपनी माधुरी दीक्षित यांच्या वर एक मालिका बनवित आहे. या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी माधुरीला मोठ्या प्रमाणात ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.असे समजले आहे की बीजॉय नंबियार आणि करिश्मा कोहली ही वेब सीरिज दिग्दर्शित करू शकतात.जी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित  होईल.माधुरी यांना अखेरचे वर्ष 2019 मध्ये 'कलंक ' या चित्रपटात बघितले  होते. 
 
त्याचबरोबर, वयाच्या 54 व्या वर्षीही माधुरी पूर्णपणे फिट आहे. आजही लोक धक धक गर्ल ला बघण्यासाठी अस्वस्थ होतात. माधुरी दीक्षितने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या 'अबोध' चित्रपटाद्वारे केली होती. उत्कृष्ट अभिनयाबरोबरच माधुरीने बॉलिवूडमध्ये असे अनेक डान्स देखील दिले आहेत जे लोकांच्या लक्षात राहतील.

एक काळ असा होता की चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना प्रमुख महिला कलाकार म्हणून सर्वात जास्त पैसे दिले जायचे. या व्यतिरिक्त त्यांनी 'तेजाब', 'राम लखन', 'परिंदा', 'दिल तो पागल', 'पुकार', 'लज्जा', 'देवदास', 'आजा नचले' या सुमारे 70 चित्रपटांमध्ये काम केले.

सध्या माधुरी रियालिटी डान्स शो मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.आता या पदार्पणाने त्या आपल्या चाहत्यांसाठी काय सरप्राईझ घेऊन येणार आहे,या बाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे.