शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (14:42 IST)

आर्थिक गैरव्यहार प्रकरणी यामी गौतमला EDचा दणका

अभिनेत्री यामी गौतम हिला प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहे. FEMA (फॉरेन एक्सचेंज मैनेजमेंट एक्ट) च्या उल्लंघनाच्या संदर्भात तिच्याकडे  चौकशी केली जाईल. या प्रकरणात यामीला दुसर्यां दा समन्स बजावण्यात आले आहे. गेल्या वर्षी प्रथम समन्स बजावण्यात आला होता. लॉकडाउनच्या निर्बंधामुळे ती त्यावेळी ईडी कार्यालयात पोहोचू शकली नाही. यामीला 7 जुलै पर्यंत ईडी कार्यालय गाठायचे आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही तर तिला अटकही केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
2019मध्ये आली होती 'उरी'
यामी गौतम सध्या आपल्या लग्नामुळं चर्चेत आहे. तिनं दिग्दर्शक आदित्य धारसोबत लग्न केलं. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून अमाप यश मिळवणाऱ्या आदित्यने याआधी ‘काबूल एक्स्प्रेस’, ‘तेज’, ‘आक्रोश’सारख्या चित्रपटांसाठी गीतकार, पटकथाकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तर हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या यामीनेही गेल्या काही वर्षात अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. या दोघांच्या विवाहाची अचानक आलेली वार्ता त्यांच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरली होती.