सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (14:07 IST)

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच हे दोघेही चेन्नईतील फॅमिली कोर्टात पहिल्यांदा हजर झाले. 2022 मध्ये सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. काही काळापूर्वी सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, दोघे पुन्हा एकत्र एक नवी सुरुवात करू शकतात. हे दोघेही तीनवेळा सुनावणीला हजर न राहिल्याने असा अंदाज बांधण्यात आला. मात्र, आज म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी दोघांनीही कोर्टात आपला इरादा व्यक्त केला आणि वेगवेगळ्या वाटांवर पुढे जायचे असल्याचे सांगितले.
 
घटस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. या तारखेला अंतिम निर्णयही दिला जाण्याची शक्यता आहे. ऐश्वर्या आणि धनुष कोर्टात हजर असताना मास्क घातलेले दिसले.

ऐश्वर्या आणि धनुषने 2004 मध्ये चेन्नईमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. 17 जानेवारी, 2022 रोजी, धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या विभक्त होण्याचा निर्णय शेअर करत एक संयुक्त निवेदन जारी केले. धनुष आणि ऐश्वर्या हे यात्रा आणि लिंगा या दोन मुलांचे पालक आहेत आणि ते आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत.

नयनताराच्या आरोपानंतर धनुष अलीकडेच चर्चेत आला होता. नयनताराने शनिवारी (16 नोव्हेंबर) इंस्टाग्रामवर तीन पानांचे पत्र प्रसिद्ध केले होते.

 
Edited By - Priya Dixit