शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (15:50 IST)

धनुष-ऐश्वर्याचा घटस्फोटावर निर्णय?

दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, हे जोडपे घटस्फोट घेणार नाहीत. धनुष आणि ऐश्वर्याने यावर्षी जानेवारीत घटस्फोटाची घोषणा केली होती, पण आता दोघांनीही आपला विचार बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनुष आणि ऐश्वर्याला आता त्यांच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची होती.
 
मीडिया रिपोर्टनुसार, निर्णयापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांची रजनीकांत यांच्या घरी बैठक झाली. यादरम्यान सर्वांनी धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट थांबवण्याचा निर्णय घेतला. हे जोडपे त्यांच्या नात्यावर काम करण्याचा प्रयत्न करतील असेही ठरले. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रजनीकांत यांनी आपल्या मुलीचे घर वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

Edited by : Smita Joshi