रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2017 (10:53 IST)

दीपिका आणि प्रियांका चोप्रा साकारणार “लेडी डॉन’

विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमामध्ये “लेडी डॉन’ची भूमिका दीपिका पदुकोण साकारणार असे पूर्वी समजले होते. डॉन दाऊद इब्राहिमला मारण्यास गेलेल्या राहिमा खान उर्फ सपना दीदीचा रोल ती साकारणार आहे. एस. हुसैन झैदी यांच्या “माफिया क्‍वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. मात्र आता ही अंडरवर्ल्डमधील भूमिका प्रियंका चोप्रा करणार असल्याचे समजते आहे. अर्थात प्रियंकाचा सिनेमाही वेगळाच आहे. प्रियंका जी अंडरवर्ल्ड लेडीची व्यक्तिरेखा साकारणार आहे, तिचे नाव गंगूबाई कोठेवाली असे असणार आहे. “द मॅडम ऑफ कामठीपुरा’ असे तिच्या सिनेमाचे नाव असणार असून संजय लीला भन्साळी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. संजय आणि विशाल भारद्वाज या दोघांच्याही सिनेमांमध्ये लेडी डॉनच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्रींची निवड करणे खूपच अवघड होते. यापूर्वी प्रियंकाने “गंगाजल 2’मध्ये ऍक्‍शन रोल केला होता. पण ती संधी दीपिकाला या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली.