गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (12:46 IST)

Dream Girl 2 Teaser Out : ड्रीम गर्ल 2 चे टीझर रिलीझ , या दिवशी होणार फर्स्ट लूक प्रदर्शित

Dream Girl 2 Teaser Out: आयुष्मान खुरानाचा आगामी सिनेमा 'ड्रीम गर्ल 2' चा टीझर गुरुवारी रिलीज झाला. पूजाने (आयुष्मान) या टीझरमध्येही आगामी चित्रपटांतील प्रसिद्ध पात्रांशी संवाद साधण्याची तिची परंपरा पाळली आहे. ती रॉकी म्हणजेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या रणवीर सिंगसोबत फोनवर बोलताना दिसत आहे. हा करण जोहरचा आगामी चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट देखील आहे.

ड्रीम गर्ल 2 टीझर आऊट झाला असून या व्हिडीओ मध्ये  रॉकी पूजाच्या लाल साडीचे कौतुक करत आहे. ते म्हणतात की तुम्ही विश्वचषक स्पर्धेसारखे आहात, जी 4 वर्षांनंतर परतली आहे. पूजा स्वतःला 'ट्रॉफी' म्हणवते. यासोबतच तिने 25 जुलैला तिचा फर्स्ट लूक समोर येणार असल्याचेही जाहीर केले.
 
हा प्रोमो चित्रपटाची निर्माती एकता कपूरनेही शेअर केला आहे. ती लिहिते, 'पूजा हा सण आहे, यावेळी 25 तारखेला आहे. तुमची पूजा ड्रीम गर्ल 25 जुलै रोजी एक रॉकिंग सरप्राईझ घेऊन येत आहे. 
 
'ड्रीम गर्ल 2' ची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे आणि प्रतिभावान राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केली आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा 29 जून आणि नंतर 7 जुलैला रिलीज होणार होता, पण निर्मात्यांनी रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बॅनर्जी आणि मनजोत सिंग यांच्यासोबत अनन्या पांडेही आहे.

Edited by - Priya Dixit