गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (12:41 IST)

Arjun Rampal: अभिनेता अर्जुन रामपाल चौथ्यांदा बाबा झाला

arjun rampal
बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या व्यावसायिक तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जबरदस्त चर्चेत असतो. अभिनेत्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने चार वर्षांपूर्वी एरिक नावाच्या मुलाला जन्म दिला. गॅब्रिएलाने एप्रिल 2023 मध्ये तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा करत सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना थक्क केले. आता ग्रॅबिएला दुसऱ्यांदा आई झाली आहे, तसेच अर्जुन रामपाल जो पुन्हा एकदा पिता झाला आहे, अर्जुन ही आपला आनंद पोस्टच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे. 
 
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल यांना त्यांचे दुसरे अपत्य म्हणून मुलगा झाला. आनंद शेअर करताना अर्जुनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर विनी-द-पूहचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये 'हॅलो वर्ल्ड' प्रिंटेड टॉवेल आहेत. त्याचवेळी, अभिनेत्याने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, 'मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका सुंदर मुलाचा आशीर्वाद मिळाला आहे. आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांच्या अद्भुत टीमचे आभार.आम्ही चंद्रावर आहोत.हॅलो वर्ल्ड 20.07.2023
///
अभिनेता अर्जुन रामपालची ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चाहत्यांसह स्टार्स या जोडप्याचे खूप अभिनंदन करत आहेत. बॉबी देओलने कमेंट करत लिहिले, 'अभिनंदन मित्रा.' राहुल देव यांनी लिहिले, 'बाबा आणि आईचे खूप अभिनंदन.'
 





Edited by - Priya Dixit