सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (15:02 IST)

अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी बनली आई, इशिता दत्ताने मुलाला जन्म दिला

Ishita Dutta blessed with a baby boy 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता आणि तिचा पती वत्सल सेठ एका लाडक्या मुलाचे पालक झाले आहेत. 19 जुलै रोजी अभिनेत्री आई झाली. आई आणि मुलगा दोघेही निरोगी असून अभिनेत्रीला 21 जुलै 2023 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
 
'ETimes' च्या रिपोर्टनुसार, इशिता दत्ताने 19 जुलै 2023 रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तेव्हापासून इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
 
इशिता दत्ता तिच्या गरोदरपणात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असते. याशिवाय इशिताने तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना अनेक फोटोही शेअर केले आहेत. लग्नाच्या 6 वर्षानंतर ही अभिनेत्री आई झाली आहे.
 
इशिता दत्ताने 28 नोव्हेंबर 2017 रोजी वत्सल सेठसोबत लग्न केले होते. दोघांची पहिली भेट 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती.