शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (21:13 IST)

तू कधीच चांगली आई बनू शकत नाहीस….,लोकांच्या या टोमण्यावर काय म्हणाली आलिया भट्ट?

alia bhat
Alia Bhatt मुंबई- सिनेइंडस्ट्रीत अनेक अभिनेत्रींनी आई झाल्यानंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेतला किंवा अभिनय कायमचा सोडला. मात्र, अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात चांगला समतोल राखत आहे. आई होण्याचे कर्तव्य पार पाडण्यासोबतच ती तिच्या स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहे.
 
एका मुलाखतीत आलिया म्हणाली,”समतोल नेहमीच बरोबर नसतो. काहीतरी त्रास सहन करावाच लागतो. तुम्हाला असे वाटते की तुम्ही सर्व केले तर तुमचे काहीही नुकसान होणार नाही. तुम्ही सर्व काही करू शकता, परंतु त्याने तुमच्या मनःशांतीवर परिणाम होईल आणि मला वाटते की असे बरेचदा घडते. मला प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या उपस्थित राहायचे असते पण यामुळे मी स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही, मी काहीही विचार करू शकत नाही. मला असे वाटते की हे सर्व प्राधान्यावर अवलंबून आहे.”
 
आलिया भट्टने उघड केले की तिला कोणीतरी सांगितले होते की ती कधीच चांगली आई किंवा उत्तम व्यावसायिक बनू शकत नाही. यावर ती म्हणाली, “कुणीतरी मला एकदा सांगितले की तू कधीच एक चांगली आई किंवा एक उत्तम व्यावसायिक, एक उत्तम मुलगी किंवा कोणतीही महान गोष्ट बनू शकत नाही. आपल्याकडे महानतेला किंवा चांगुलपणाला जास्त महत्व दिले जाते. तुम्ही फक्त छान आणि प्रामाणिक असला पाहिजेत. मोकळेपणाने संवाद साधा. म्हणून मी तेच करण्याचा प्रयत्न करते. मी माझे कुटुंब आणि मित्रांसोबत मनमोकळेपणाने बोलते. तरीही, कधीकधी मला असे वाटते की मी खूप जबाबदारी घेत आहे, पण त्याचवेळी मला असेही वाटते की मी ती जबाबदारीसोबत. पुढे जात आहे. माझ्याकडे उत्तर नाही.
 
कुटुंबाच्या फायद्यासाठी ती आपले काम सोडणार नसल्याचेही आलिया भट्टने सांगितले. आलिया आणि रणबीर कपूर नोव्हेंबर २०२२ मध्ये एका मुलीचे पालक झाले, त्यांच्या मुलीचे नाव राहा आहे. सध्या आलिया रणवीर सिंहसोबत तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, हा चित्रपट २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे.