शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (21:00 IST)

Urfi Javed new look उर्फी जावेदचा नवा लूक पाहिलात का? टोमॅटोचे कानातले घालत उर्फी म्हणाली….

urfi javeds
Instagram
Urfi Javeds new look आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकते. पण तरीही वेगवेगळे लूक करत ती चाहत्यांना थक्क करते. दररोज वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत ती तिचा लूक पूर्ण करत असते. आता उर्फीने चक्क टोमॅटोचे कानातले घातले आहेत. उर्फीने टोमॅटोचा वापर करत तिचा नवा लूक बनवला आहे.
 
टोमॅटोच्या भाव वाढीचा उर्फीला चांगलाच फायदा झाला आहे. उर्फीने सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि वन साइट क्रॉप टॉप परिधान केला आहे. तसेच ते टोमॅटो खातानाही दिसत आहे. हाय बन आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. पण या सगळ्यात भाव खाऊन गेलेत ते उर्फीचे कानातले.
 
उर्फीने टोमॅटोचे कानातले घातले आहेत. टोमॅटोचे कानातले घातलेले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत उर्फीने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,”टोमॅटो आता नवीन सोनं आहे”. उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.