गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (17:04 IST)

रोहित शर्माचा नवा लूक व्हायरल

Instagram
सध्या सर्वत्र क्रिकेट आयपीएलचे वारे सुरु असून मुंबई इंडियन्स सर्वात लोकप्रिय टीम बनली आहे. IPL 2023 (IPL 2023), मुंबई इंडियन्सला पुढील सामना कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) विरुद्ध खेळायचा आहे. त्याचवेळी संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. मात्र, एमआयचा कर्णधार रोहित शर्मा केकेआरविरुद्ध खेळण्यापूर्वी नव्या लूकमध्ये दिसला कप्तानने त्याच्या इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो बॉलीवूड स्टार संजय दत्तच्या 'वास्तव' चित्रपटातील 'पचास तोला' लूकमध्ये दिसत आहे.
केकेआरविरुद्ध खेळण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलसोबत एक जाहिरात करत आहे. दरम्यान, रोहित शर्मा बॉलिवूड स्टार संजय दत्तच्या वास्तव लूकमध्ये दिसणार आहे. रोहितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि निळ्या रंगाचा वास्कट घातला आहे. याशिवाय चित्रपटातील संजय दत्तप्रमाणेच त्यानेही गळ्यात पन्नास तोळ्याची सोन्याची चेन आणि हातात सोन्याची माळ घातली आहे. त्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
Edited By - Priya Dixit