गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (23:33 IST)

गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला

ipl 2023
मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर यजमान पंजाब किंग्जला पराभवाची चव चाखावी लागली. गतविजेत्या गुजरातने अंतिम षटकात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला 8 विकेट्सवर 153 धावाच करता आल्या. गुजरातने हे लक्ष्य 1 चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून पूर्ण केले.