मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (09:40 IST)

सोशल मीडियावर 'ड्रीम गर्ल'च्या पार्टी सॉग्नची मोठी धूम

Dream Girl's Party Song's Big Thing on Social Media
बहुप्रतिक्षित 'ड्रीम गर्ल' चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी 'ड्रीम गर्ल'मधील एक पार्टी सॉन्ग प्रदर्शित करण्यात आलं आहे. आयुषमान खुराना आणि नुसरत भरुचा यांच्या पार्टी सॉग्नची सोशल मीडिया आणि यूट्यूबवर चांगलीच धूम आहे. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरलाही  प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
 
झी म्युझिक कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर हे पार्टी सॉन्ग रिलीज करण्यात आलं. 'गट गट' असं या गाण्याचं नाव आहे. या पंजाबी पार्टी सॉन्गमधील व्हिडिओत नुसरत आणि आयुषमानच्या डान्स मूव्ह्जचीही चांगलीच चर्चा आहे. राज शांडिल्य यांनी 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर एकता कपूरने चित्रपटाची निर्मिती केली आहे. १३ सप्टेंबर रोजी 'ड्रीम गर्ल' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.