Ekta Kapoor Trolled: आमिरला लिजेंड म्हणणे एकताला भोवले, युजर्सचा बालाजी टेलिफिल्म्सला बॉयकॉट
"इंडस्ट्रीतील सर्व खान, विशेषत: आमिर खान दिग्गज आहेत"..... एकता कपूर तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. वास्तविक, आमिर खान आणि करीना कपूर स्टारर 'लाल सिंह चड्ढा' अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर 'रक्षा बंधन' सोबत 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. मात्र, प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपट नाकारले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाहीत.
बॉक्स ऑफिसवर अपयशी होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर सुरू असलेला 'बॉयकॉट लाल सिंह चड्ढा' आणि 'बॉयकॉट रक्षा बंधन' या हॅशटॅगचा ट्रेंड सांगण्यात येत आहे. अलीकडेच एकता कपूर जेव्हा तिच्या 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मीडियामध्ये पोहोचली तेव्हा तिला या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल विचारण्यात आले. तेव्हा एकता म्हणाली, "ज्यांनी उत्तम बिझनेस दिला त्यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत हे खूप विचित्र आहे. इंडस्ट्रीतील सर्व खान (शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान) आणि विशेषतः आमिर खान हे लिजेंड आहेत. आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकत नाही. आमिर खानवर कधीही बहिष्कार टाकता येणार नाही.
एकता कपूर तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. लोक तिला सतत ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'बॉलिवुडमध्ये हॅशटॅग करण्याची स्पर्धा सुरू आहे...हॅशटॅग अर्जुन कपूर...हॅशटॅग एकता कपूर'. आणखी एका युजरने लिहिले, 'एकता कपूरवर बहिष्कार टाका. बालाजी टेलिफिल्म्सवर बहिष्कार टाका. जिहादीवुडवर बहिष्कार टाका.असं म्हणत एकता कपूरला ट्रोल करत आहे.