1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:34 IST)

पुनीत राजकुमारच्या निधनानंतर नेत्रदान वाढले, तिघांची नेत्रदानासाठी आत्महत्या

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनानंतर दु:खामध्ये जवळपास 10 चाहत्यांनी प्राण गमावले आहेत. विशेष म्हणजे मृत्यूनंतर लाडक्या हिरोप्रमाणे नेत्रदानाचा संकल्पही चाहत्यांनी केला आहे.
पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर धक्क्यात झालेल्या मृत्यूचा विचार करता, 10 पैकी 7 जणांनी आत्महत्या केली आहे. तर तिघांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.
 
आत्महत्या केलेल्या चाहत्यांपैकी तीन जणांनी नेत्रदान करण्यासाठी आत्महत्या केली असल्याचंही म्हटलं आहे. सुपरस्टार पुनीत राजकुमारनं मरणोत्तर नेत्रदान केलं होतं. त्यामुळं चाहत्यांनीही त्याचं अनुकरण केलं आहे.
 
पुनीत याच्या मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.