रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:02 IST)

पाडव्याच्या दिवशी आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मिरज तालुक्यातील टाकळी ओढ्यात दोन पारधी तरुणी व एक बालिकेचा बुडून मृत्यू जाला. टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली. नंदिनी देवा काळे, मेघा चव्हाण काळे आणि स्वप्नाली टवळ्या पवार अशी तिघांची नावे आहेत. हे सर्व जण टाकळी येथील आंबेडकर नगरमध्ये राहतात. दुपारच्या सुमारास तिघी जणी अंघोळीला गेल्या होत्या. त्या परन न आल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. ओढ्यच्या काठावर तिघींची चप्पल, कपडे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना पाण्यात बुडल्याची शंका आली. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचले आणि तिघींचे मृतदेह बाहेर काढले.