रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (15:08 IST)

Bigg Boss Marathi 3 स्नेहा-जयचा तो व्हिडिओ व्हायरल, चाहते म्हणाले नुसता पांचटपणा

बिग बॉस मराठी 3 मध्ये चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या कॅप्टन्सी कार्यादरम्यान घरात जोरदार राडा झाला आणि या टास्कमध्ये नियम धाब्यावर बसवले गेले. प्रचंड धक्काबुक्कई झाली त्यामुळे बिग बॉसनी सदस्यांची कानउघडणी केली.
 
काहींना ताकीद दिली तर विशालला प्रॉपर्टीचं नुकसान झाल्याबद्दल पुढील आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं गेलं. परंतु त्याहून अधिक चर्चा रंगत आहे की जय आणि स्नेहामधील त्या व्हिडिओची. 
 
हा टास्क संपल्यावर रात्री स्नेहा वाघ आणि जय दुधाणे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले. सध्या याची चर्चा सुरु आहे. दोघांमध्ये नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
 
चर्चेत असेल्या या व्हिडिओत जय- स्नेहा किचनमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. गेल्या काही एपिसोडपासून स्नेहा आणि जय यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याचे समजते. तर दुसरीकडे ही जवळीक फक्त गेमसाठी तर नाही ना असा अंदाज देखील काही चाहते बांधत आहे. 
 
तर काहींनी जय- स्नेहा दोघांना ट्रोल केले. लोकं कमेंट्स करुन आपले मत मांडत आहे. टीआरपीसाठी तर ही जोडी दाखवत नाहीये नं? असा प्रश्नही चाहत्यांना पडत आहे.