शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (16:26 IST)

प्रसिद्ध दिग्दर्शकाला एका वर्षासाठी कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांना मोठा झटका बसला आहे. चेक बाऊन्स प्रकरणी राजकुमार संतोषीला दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
 
राजकुमार संतोषीला दोन वेगवेगळ्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. राजकुमार संतोषी यांनी तक्रारदाराला एकूण 22.5 लाख रुपये दोन महिन्यांत परत करावेत, असे न केल्यास त्यांना एक वर्ष तुरुंगात घालवावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
 
राजकुमार संतोषी यांनी अनिल जेठानी यांच्याकडून व्यवसाय करण्यासाठी  कर्ज घेतले होते. या संदर्भात त्यांनी त्यांना तीन धनादेश दिले होते, त्यांची एकूण किंमत 22.50 लाख रुपये होती. मात्र तिन्ही धनादेश बँकेत जमा केले असता पैशांअभावी ते बाऊन्स झाले. त्यानंतर तक्रारदाराने आपल्या वकिलामार्फत याप्रकरणी राजकुमार संतोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजकोट न्यायालयात राजकुमार संतोषीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
यावर सुनावणी करताना राजकोटचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एनएच वासवेलिया यांनी राजकुमार संतोषीला एक वर्षाची शिक्षा सुनावली.