मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (15:56 IST)

वरण भाताच्या कुकर’ने घरात ‘रामायण’, ‘महाभारत’ ! जावयाला सासरकडच्यांनी बेदम चोपले; जाणून घ्या प्रकरण

पुणे :सासरी आलेल्या सूनेला स्वयंपाकावरुन नेहमीच टोमणे मारले जातात़ अनेकदा तिला कुकरही लावता येत नाही, अशी टिका केली जाते. मात्र, एका घरात ‘वरण भाताच्या कुकर’ने केवळ भांडणेच (Pune Crime) नाही तर चक्क ‘रामायण’, ‘महाभारत’ घडले.
 
याप्रकरणी उषा वसंत रणसिंग (वय ५५, रा. दळवी वस्ती, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश नवगिरे, कैलास नवगिरे, योगेश नवगिरे, मंगेश नवगिरे (सर्व रा. लोहियानगर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत उषा रणसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार ३०  ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता (Pune Crime) घडला. फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांची सून अर्चना हिने वरण भाताचा कुकर लावला होता. तिने लवकर न पाहिल्याने वरण भात जळाला. तेव्हा त्यांचा मुलगा किरण याने अर्चना हिला रागावून तिचे डोक्यात चापट मारली. त्यामुळे रागावलेल्या अर्चना हिने हा प्रकार आपले आई, वडिल, भाऊ यांना फोन करुन सांगितला. आरोपी हे सर्व जण त्यांच्या घरी आले. त्यांनी किरण रणसिंग याला हातामध्ये असलेल्या लाकडी बॅट व दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी व त्यांच्या सुनांनाही मारहाण करुन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत.