शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (14:03 IST)

प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन

फोटो साभार- सोशल मीडिया 
प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे वयाच्या 89 वा वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांनी पुण्याच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर रविवारी दुपारी पुण्यातील वैकुंठधामात अंत्यसंस्कार केले जातील. जोग यांनी व्हायोलिन वादक म्हणून कारकिर्दी गाजवली. त्यांना 'गाणाऱ्या व्हायोलिनचा जादूगार ' असे म्हणून ओळखायचे. त्यांनी संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून आपली छाप मराठी सिनेसृष्टीवरच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीवर देखील छाप सोडली. त्यांनी गीत रामायणात आपले संगीत दिल्यामुळे आज गीत रामायण अजरामर झाले. त्यांनी संगीतकार सुधीर फडके बाबूजी यांच्या सह त्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्याची बाबुजींसह त्यांच्या तब्ब्ल 500 पेक्षा अधिक कार्यक्रमांना साथ दिली. जोग यांनी वयाच्या 5 व्या वर्ष पासून सायं शिकायला सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्ष पासून व्हायोलिनचे कार्यक्रम देण्यास सुरु केले. यांना चाहते 'जोगकाक' म्हणायचे. जोग यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांना वसुंधरा पंडित पुरस्कार, ज्ञान साम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सुरसिंगार पुरस्कार तसेच नेत्रदीपक चित्रकर्मी पुरस्काराने गौरवले. त्यांचे पार्थिव त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे. आज 11 ते 4 च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे