बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (09:16 IST)

आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं, आई म्हणून खूप वाईट वाटतं : सुप्रिया सुळे

आर्यन खानने ड्रग्ज घेतलं नव्हतं, तर मग त्याला 25 दिवस तुरुंगात का ठेवलं? असा सवाल करतानाच एक आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे
शाहरुख खान हा आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. अशाने भारताचं नावही खराब होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
"आर्यन खाननं ड्रग्ज घेतलं नाही. मुलाकडे काहीच सापडलं नाही. एखादा मुलगा निर्दोष असेल तर मग त्याला 25 दिवस कोठडीत का ठेवलं? आई म्हणून मला त्याचं वाईट वाटतं.
 
"शाहरूख खानं हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारलं जातं. पण अशा प्रकरणाने भारताचंही नावं खराब होतं. चुक नसतानाही अधिकारी कारवाई करत असेल तर चुकीचं आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.