गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (23:17 IST)

प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन ;पार्थिव मुंबईत दाखल, उद्या अंत्यसंस्कार

बॉलिवूड गायक केके (कृष्ण कुमार कुननाथ) यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. यामध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक म्हणजेच कार्डिअॅक अरेस्ट असे देण्यात आले आहे. त्याच्या लिव्हर आणि फुफ्फुसाची प्रकृतीही गंभीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात केकेचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या पोस्टमॉर्टेमचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.
 
गायक केके यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव कोलकाता येथील रवींद्र भवनात ठेवण्यात आले. तिथे त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी संपूर्ण वेळ उपस्थित होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे पार्थिव विमानाने मुंबईला आणण्यात आले. रात्री 8.35 च्या सुमारास त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावरून वर्सोवा येथे आणण्यात आले. त्याचवेळी मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध गायकाच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच 2 जून रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चाहत्यांना त्यांचे शेवटचे दर्शन व्हावे यासाठी त्यांचे पार्थिव निश्चित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. 
 
केके यांचे पार्थिव बुधवारी रात्री 8 वाजता एअर इंडियाच्या एआय 773 या विमानाने मुंबईत पोहोचले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी घराजवळील वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
यापूर्वी कोलकाता येथे त्यांना राज्य सन्मानाने श्रद्धांजली वाहण्यात आली होती. यावेळी त्यांची पत्नी ज्योती कृष्णा, मुलगा नकुल आणि मुलगी तमारा यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता येथील रवींद्र सदनात पोहोचून केके यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
 
मंगळवारी कोलकाता येथील नजरुल मंच ऑडिटोरियममध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये केकेचे लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अस्वस्थ वाटू लागले.नंतर ते  हॉटेलमध्ये पोहोचले , जिथे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने जवळच्या सीएमआरआय (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 
 
काही रिपोर्ट्समध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचेही बोलले जात आहे. त्याचवेळी कोलकाता येथील न्यू मार्केट पोलिस स्टेशनमध्ये सिंगरच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कन्सर्टचे  सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केले. केके यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे, सर्व वयोगटातील लोक त्यांच्या गाण्यांशी जोडलेले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या गाण्यांमधून ते  कायम आपल्या हृदयात जिवंत राहील. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले  आहे.
 
केके यांच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे.