गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (18:09 IST)

सलमान खानची सुरक्षा वाढवली

गायक-राजकारणी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी मुंबई पोलिसांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित लॉरेन्स बिश्नोई याने काही वर्षांपूर्वी अभिनेत्यावर हल्ल्याची योजना आखली होती. हे लक्षात घेऊन पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. , सध्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगात बंद आहे.
 
राजस्थानमधील या टोळीशी संबंध असल्याचा खुलासा मुंबई पोलिस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे की, "आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सलमान खानच्या अपार्टमेंटच्या आसपास पोलिस उपस्थित राहतील.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पोलिसांना सलमान खानवर झालेल्या हल्ल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढविण्याचे निर्णय घेतले. विशेष म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड गोल्डी बरार याने मूसवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याच टोळीने चार वर्षांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.