Marathi Biodata Maker
✕

कमल हासनच्या कार्यक्रमात चाहता मंचावर तलवार घेऊन चढला

Updated: मंगळवार, 17 जून 2025 (08:31 IST)
ALSO READ: Ahmedabad plane crash गुजराती चित्रपट निर्माते महेश जिरावाला बेपत्ता
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की कमल हासन तलवार घेण्याचे टाळत होते आणि चाहत्या पासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तथापि,चाहता त्याच्या हट्ट्यावर ठाम राहिला, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले.
 
चाहत्याच्या आग्रहामुळे नाराज झालेल्या कमल हासन स्टेजवरच संतापलेले दिसले. त्यांच्या टीमच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी स्टेजवरूनच चाहत्याला ताबडतोब बाहेर काढण्याचे निर्देश दिले. परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि अभिनेत्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली.या घटनेचा व्हिडिओ पीटीआयच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ALSO READ: तेलंगणा सरकार कडून अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
कमल हासन सध्या त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत आहेत. अलिकडेच, त्यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात त्यांनी म्हटले की "कन्नड भाषेची उत्पत्ती तमिळ भाषेतून झाली आहे." आणि त्यानंतर, या विधानामुळे कर्नाटकात गोंधळ निर्माण झाला.
ALSO READ: 'रेड 2' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज,कधी आणि कुठे पाहता येईल
लोकांनी याला कन्नड भाषेचा अपमान मानले आणि सर्वत्र निषेध सुरू झाले. त्यांचे पोस्टर्स जाळण्यात आले आणि कर्नाटक फिल्म चेंबरने जाहीर केले की जोपर्यंत कमल हासन माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचे कोणतेही चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार नाहीत.
सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे आणि कमल हासन यांच्या विधानावरून सुरू झालेला गोंधळ थांबलेला नाही.
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments