रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ब्लॅकआऊट करून देणार ‘पद्मावती’ला पाठींबा

‘पद्मावती’ चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसियशन (आयएफटीडीए) आणि इतर 20 संघटनांनी मिळून 15 मिनीटांचा ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिएटिव्ह व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितेल. टीव्ही इंडस्ट्रीतील लोक ‘मैं आझाद हूँ’ या शीर्षकाखाली ब्लॅकआऊटमध्ये सहभागी होणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी फिल्म सिटीच्या गेटवर दुपारी 3.30 वाजता हे आंदोलन करणार आहेत.
 
याबद्दल बोलताना ‘आयएफटीडीए’चे अशोक पंडित म्हणाले, ‘आम्ही ‘पद्मावती’ चित्रपट आणि संजय लीला भन्साळी यांना पाठिंबा दर्शवत आहोत. व्यक्तीला एखादी कथा स्वतःच्या पद्धतीने सांगण्याचा मुलभूत अधिकार आहे. ते जबाबदार दिग्दर्शक आहेत, ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनवणे ही सोपी गोष्टी नाही. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही रविवारी मुंबईतील सर्व शूटींग युनिटस 15 मिनीटांसाठी लाईटस बंद करतील, कुठेही शूटींग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.