सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025 (16:48 IST)

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ सह एक दमदार अभियान #NotJustMoms!

Star Plus launches a powerful campaign NotJustMoms with Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi
टेलिव्हिजनच्या क्षेत्रात सांस्कृतिक संदर्भ आणि मनोरंजन यांचे मिश्रण करणाऱ्या कल्पना सादर करण्यात स्टार प्लसने लक्षणीय भूमिका बजावली आहे. जनमानसावर मोठा प्रभाव टाकणारी अशीच एक मालिका आहे, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’. अनेक वर्षांनी ही मालिका टेलिव्हिजनवर परतली आहे आणि समकालीन सामाजिक समस्यांना संबोधित करून परिवर्तनास चालना देण्याचा वारसा चालू ठेवून पुन्हा आपली संबद्धता सिद्ध करत आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ चा नवीन प्रोमो विचार-प्रवण अभियान #NotJustMoms प्रेक्षकांसमोर घेऊन येतो आणि ही गोष्ट अधोरेखित करतो की, मुलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त आईची नसून ती आई-वडील दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.
 
हा प्रोमो भारतीय कुटुंबाच्या बदलत्या चेहऱ्या-मोहऱ्याशी सुसंगत अशी चर्चा छेडतो. आजच्या पिढीत जीवनाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत पालकांची कर्तव्ये दोघे मिळून शेअर करताना दिसतात. पण मग मूल ही केवळ आईचीच जबाबदारी का समजली जाते? या प्रोमोमध्ये असे दैनंदिन क्षण दाखवले आहेत, जेथे मुलांना मूल्य आणि शिस्त शिकवण्याच्या अपेक्षेचे अनुचित ओझे मातांवर टाकले जाते आणि प्रोमोचे समापन एका स्पष्ट संदेशाने केला जातो: मुलांचे पालन पोषण ही सामाईक जबाबदारी आहे.
 
अलीकडेच योजलेल्या FICCI इव्हेंटमध्ये स्मृती इराणी आणि एकता कपूर यांनी एक दमदार #NotJustMoms प्रोमो सादर केला आणि मुलांच्या पालन-पोषणाबाबत एका भावनिक आणि विचार-प्रवण संवादाला चालना दिली. *या वेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की,* “आम्ही ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ टीम या विचाराला समर्थन देतो की लहान मुलांचे संगोपन करणे ही केवळ मातांची जबाबदारी नाही. मूल्यांच्या अपयशाचा ठपका त्यांच्या आईला दिला जातो, पण मुलाचे यश आणि कीर्ती याबद्दल मात्र तिचे कौतुक होत नाही. त्यामुळे, जर मुलांच्या संगोपनाबाबतच्या समानतेविषयी बोलायचे झाले, तर हे अभियान हेच सांगते की, यासाठी केवळ आई दोषी ठरत नाही, ही तिच्या एकटीची जबाबदारी नाही.”
 
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या पूर्वी अत्यंत गाजलेल्या मालिकेत तुलसीची भूमिका करणारी स्मृती इराणी इतक्या वर्षांनी पुन्हा त्या भूमिकेत दिसत आहे. अशा या मालिकेत हा विचार मालिकेचा सांस्कृतिक प्रभाव अधोरेखित करतो आणि समान पालकत्वाचे महत्त्व ठासून सांगतो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by StarPlus (@starplus)

*या विषयी बोलताना स्टार प्लसच्या  प्रवक्त्याने सांगितले,* “स्टार प्लसमध्ये आम्ही हे मानतो की कथांमध्ये परिवर्तनाला चालना देण्याचे बळ असते. #NotJustMoms अभियानासह, आम्ही या जुन्या साचेबंद विचाराला आव्हान देत आहोत की, लहान मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी फक्त आईची असते. तुलसीला नव्या प्रकाशात सादर करून या संवादाला चालना देण्यासाठी आणि देशातील कुटुंबांना सामाईक पालकत्व स्वीकारण्यास प्रेरित करण्यासाठी ही ब्रॅंड फिल्म तयार करण्यात आली आहे.”
 
#NotJustMoms या अभियानात चांगले मनोरंजन प्रदान करताना समाजात परिवर्तन आणण्याचे स्टार प्लसचे व्हिजन स्पष्ट दिसते. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ चा हा सीझन केवळ वारसा चालू ठेवत नाही, तर भारताच्या सांस्कृतिक पटाचा भाग ठरलेल्या कथानकाला, त्यातील मूल्ये आणि भावना यांना दिलेली ही सलामी आहे.