1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (08:20 IST)

चित्रफिती या बदनामी करणाऱ्याच नाहीत, तर आपल्याविरोधात जातीय तेढ, चिथावणी निर्माण करणाऱया आहेत,सलमान खान

केतन कक्कड याने समाजमाध्यमावरून आपल्याबाबत प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती या बदनामी करणाऱ्याच नाहीत, तर आपल्याविरोधात जातीय तेढ, चिथावणी निर्माण करणाऱया आहेत, असा दावा अभिनेता सलमान खान याने उच्च न्यायालयात केला.
 
कक्कडविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिवाणी न्यायालयाने सलमानला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच कक्कड याने समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात प्रसिद्ध केलेल्या बदनामीकारक चित्रफिती काढून टाकाव्या आणि भविष्यात आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्ये करण्यास मज्जाव करावा असे आदेश देण्याची मागणी सलमानने केली आहे.