शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (22:42 IST)

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्माला मिळाली नवी दयाबेन, ही अभिनेत्री घेणार शोमध्ये एंट्री!

tarak mehta daya ben
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah  :तारक मेहता का उल्टा चष्माला नवीन दयाबेन मिळाली आहे. दिशा वकानी पहिल्या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारत होती. अनेक दिवसांपासून दिशा या शोमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा होती. पण आता दिशा वाकानी शोमध्ये परतत नसून 'तारक मेहता'मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीला घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.  
 
'तारक मेहता' हा टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो आहे. शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात खास बनली आहे दयाबेनचे पात्र हे देखील यातील एक महत्त्वाचे पात्र आहे. त्याचबरोबर टीव्ही अभिनेत्री काजल पिसाळ 'तारक मेहता'मध्ये नवीन दयाबेनच्या भूमिकेत एंट्री घेणार आहे. रिपोर्ट्सनुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी काजल पिसालला फायनल करण्यात आले आहे.  
 
काजल पिसाळच्या आधीही अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती, मात्र अद्याप एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. तर आता काजल पिसाळ 'तारक मेहता'मध्ये दयाबेनची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे.  
 
मात्र, यावर अद्याप अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच प्रॉडक्शन हाऊसने काजल पिसाळच्या नावावर काहीही सांगितलेले नाही.