बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:21 IST)

रिलीज होताच लीक झाला आमिर खानचा चित्रपट, वाचा सविस्तर

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान  हा ‘लाल सिंह चड्ढा’  या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटावर बंदीची मागणी होत होती.दरम्यान, हा चित्रपट आज सिनेमागृहात रिलीज झाला आहे. परंतु रिलीजनंतर काही वेळातच हा चित्रपट ऑनलाईन लीक (Online leak) झाला आहे.
 
चित्रपट रिव्ह्यू
‘लाल सिंग चड्ढा’चा पहिला रिव्ह्यू गेल्या सोमवारी आला. त्याचबरोबर आमिरच्या चित्रपटाला ट्विटर रिव्ह्यूमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
काहींना हे आश्चर्यकारक तर काहींना सरासरी मिळाले. सध्या बहुतांश मीडिया हाऊस ‘फॉरेस्ट गंप’चे हे हिंदी रूपांतर अप टू द मार्क सांगत आहेत.
 
चित्रपट खूप खास आहे
‘लाल सिंग चड्ढा’चे दिग्दर्शन अद्वैत चंदन  यांनी केले आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या 1994 मध्ये आलेल्या ‘फॉरेस्ट गंप’  चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटाला अनेक अकादमी पुरस्कार मिळाले.
आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खानच्या कॅमिओशिवाय करीना कपूर खान, मोना सिंग आणि साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.