गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (11:35 IST)

अखेर प्रतीक्षा संपली, मिका सिंगनं निवडली दुल्हनिया

बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध आणि ब्लॉकबस्टर गायक मिका सिंगला अखेर त्याची दुल्हनिया सापडली आहे. मिका सिंगने त्याची सर्वात जवळची आणि खास मैत्रिण आकांक्षा पुरी हिची जोडीदार म्हणून निवड केली आहे. मिका सिंगसोबत लग्न करण्यासाठी आकांक्षा पुरीने मधल्या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि आता मिकाचे  होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले 
 
मिका सिंग आणि आकांक्षा पुरी यांचे संबंध खूप जुने आणि खास आहे. मिका सिंग आणि आकांक्षा पुरी जवळपास 10-12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांनीही एकमेकांना प्रत्येक पावलावर साथ दिली आहे. पण आता दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आहे  आणि त्यामुळेच मिका सिंगने जोडीदार म्हणून आकांक्षा पुरीची निवड केली आहे.  
 
मिका सिंगसोबत लग्न करून त्याची वधू बनण्याचे स्वप्न घेऊन 12 सुंदर मुलींनी गायकाच्या स्वयंवरमध्ये प्रवेश केला. प्रत्येक मुलीसोबत मिका सिंगचे खास बॉन्ड पाहायला मिळाले. पण या 12 पैकी फक्त तीन मुलीच मिका सिंगच्या हृदयात खास स्थान निर्माण करून टॉप 3 मध्ये पोहोचू शकल्या.  
 
टॉप 3 मध्ये आकांक्षा पुरी व्यतिरिक्त फक्त पंजाबची नीत महल आणि कोलकाताची प्रांतिका दास पोहोचू शकले. शोच्या शेवटी, मिका सिंगची नीत आणि प्रांतिका सोबत एक सुंदर बॉन्ड आणि केमिस्ट्री होती. नीत आणि प्रांतिका यांनी मिका सिंगच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा आणि त्याचा जीवनसाथी बनण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु मिका सिंगची 12 वर्षां पासून असलेली  मैत्रीण आकांक्षा पुरी जिंकली. 
 
मिका सिंगने आपला निर्णय देताना सांगितले की, आकांक्षा, नीत आणि प्रांतिका या तिघांमध्ये त्याला एक खास मित्र दिसत आहे, पण त्याच्यासाठी जोडीदार म्हणून आकांक्षा पुरी आहेत. मिका सिंगने आकांक्षाला माळा आणि बांगड्याघालून तिच्या स्वयंवराचा सुंदर प्रवास पूर्ण केला. 
 
मिका सिंगने शोमध्ये आकांक्षा पुरीसोबत लग्न केले नाही, फक्त अभिनेत्रीलाच जोडीदार म्हणून निवडले. आता बघूया चाहत्यांना मिका सिंग आणि आकांक्षा पुरीचं भव्य.लग्न कधी पाहायला मिळणार आहे.