'कपिल शर्मा शो'वर FIR दाखल, कोणता सीन वादग्रस्त, वाचा

The Kapil Sharma Show
Last Modified शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (14:41 IST)
टीव्हीचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' चे निर्माते अडचणीत सापडले आहेत. या शोच्या विरोधात मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या शोच्या एका एपिसोडविरोधात तक्रार करण्यात आली आहे ज्यात कलाकारांना कोर्टरूमचे दृश्य करताना स्टेजवर मद्यपान करताना दाखवले आहे. शोमध्ये अभिनेत्यांनी न्यायालयाचा अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शिवपुरी येथील एका वकिलाने सीजेएम कोर्टात ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आपल्या तक्रारीत वकील म्हणाले, "सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा द कपिल शर्मा शो अत्यंत बेकार असून त्यात महिलांवर अपमानास्पद शेरे मारले जातात. एका एपिसोडमध्ये, स्टेजवर एक कोर्टरूम उभारण्यात आले होते आणि असे दिसून आले होते की कलाकार सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करत होते. हा न्यायालयाचा अवमान आहे. म्हणून, मी न्यायालयात कलम 365/3 अंतर्गत दोषींवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करतो.
ज्या एपिसोडविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, 'द कपिल शर्मा शो' मध्ये तो एपिसोड 19 जानेवारी 2020 रोजी प्रसारित झाला. नंतर त्याचे पुनरावृत्ती प्रसारण 24 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले. वकिलांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की शोमधील कलाकारांना मद्यधुंद कोर्टरूममध्ये काम करताना दाखवण्यात आले होते ज्यात न्यायालयाचा अवमान झाला आहे.

कॉमेडियन कपिल शर्माच्या या शोमध्ये त्याच्याशिवाय सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी, किकू शारदा आणि अर्चना सिंग सारखे कलाकार दिसतात. शोचा नवीन सीझन 21 ऑगस्टपासून प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

श्री क्षेत्र कारंजा :दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे ...

श्री क्षेत्र कारंजा :दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी किंवा कारंजा या शहराची ...

मराठी जोक : या तुझ्या मावश्या आहेत

मराठी जोक : या तुझ्या मावश्या आहेत
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.

Bigg Boss Marathi 3: घरात होणार नवीन सदस्यांची एन्ट्री

Bigg Boss Marathi 3: घरात होणार नवीन सदस्यांची एन्ट्री
सध्या कलर्स मराठी वरील BBM3 हे रियालिटी शो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतच आहे. कालच्या ...

52 लाखांचा घोडा, 9 लाखांची मांजर, ठग सुकेशने जॅकलिनला दिले ...

52 लाखांचा घोडा, 9 लाखांची मांजर, ठग सुकेशने जॅकलिनला दिले 10 कोटींची भेट, किस करतानाचा फोटो झाला व्हायरल
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मेगा ठग सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ...

कतरिना लग्नाआधी विकीच्या घरी पोहचली, चेहर्‍यावर दिसत होता ...

कतरिना लग्नाआधी विकीच्या घरी पोहचली, चेहर्‍यावर दिसत होता आनंद
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी आपल्या नात्याबद्दल अजूनही काही सांगतिलं नसलं तरी चर्चा आहे ...