बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (09:53 IST)

पाकमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, प्रशासकीय सेवेत प्रथमच हिंदु मुलगी सना रामचंद गुलवानी

पाकिस्तानच्या शिकारपूर येथील रहिवासी सना रामचंद गुलवानी यांच्यावर सर्वांना अभिमान आहे. पाकिस्तानात प्रशासकीय सेवा देणारी ती पहिली हिंदू मुलगी असेल. 27 वर्षीय या मुलीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात पाकिस्तानची सर्वात कठीण परीक्षा मानली जाणारी सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) पास केली आहे. पाकिस्तानची CSS परीक्षा ही भारतात आयोजित नागरी सेवा परीक्षेसारखीच आहे, त्यानंतर उमेदवार निवडून प्रशासकीय सेवांमध्ये जातात.
 
मे मध्ये परीक्षा उत्तीर्ण, सप्टेंबर मध्ये नियुक्ती मिळाली
सनाने मे महिन्यातच ही परीक्षा दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. भारतापासून विभक्त झाल्यापासून कोणतीही हिंदू मुलगी पाकिस्तानमध्ये प्रशासकीय सेवेत नाही. याआधी सना पाकिस्तानात सर्जन म्हणून काम करत आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिन पदवी प्राप्त केली. सना सिंध प्रांताच्या ग्रामीण जागेवरून या परीक्षेत बसली होती. ही जागा पाकिस्तान प्रशासकीय सेवा अंतर्गत येते.
 
पालकांना मेडिकलला पाठवायचे होते
वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या सना गुलवानीने सांगितले की, तिच्या पालकांना मी प्रशासकीय सेवेत जावे असे कधी वाटत नव्हते. मी वैद्यकीय क्षेत्रात सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. म्हणूनच मी आधी पालकांचे ध्येय पूर्ण केले. त्यानंतर मी माझ्या टार्गेटवर लक्ष्य क्रेंदित केले.
 
सांगण्यासारखी बाब म्हणजे पाकिस्तानची CSS परीक्षा इतकी अवघड आहे की या वर्षी फक्त दोन टक्के पेक्षा कमी लोक त्यात उत्तीर्ण होऊ शकले आहेत. ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, केवळ 1.96 लोक परीक्षा उत्तीर्ण करू शकले.

Photo: Social Media