Daily Horoscope
✕

'कपिल शर्मा शो'वर FIR दाखल, कोणता सीन वादग्रस्त, वाचा

Updated: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (14:43 IST)
 
शिवपुरी येथील एका वकिलाने सीजेएम कोर्टात ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आपल्या तक्रारीत वकील म्हणाले, "सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा द कपिल शर्मा शो अत्यंत बेकार असून त्यात महिलांवर अपमानास्पद शेरे मारले जातात. एका एपिसोडमध्ये, स्टेजवर एक कोर्टरूम उभारण्यात आले होते आणि असे दिसून आले होते की कलाकार सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करत होते. हा न्यायालयाचा अवमान आहे. म्हणून, मी न्यायालयात कलम 365/3 अंतर्गत दोषींवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करतो.
 
ज्या एपिसोडविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, 'द कपिल शर्मा शो' मध्ये तो एपिसोड 19 जानेवारी 2020 रोजी प्रसारित झाला. नंतर त्याचे पुनरावृत्ती प्रसारण 24 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले. वकिलांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की शोमधील कलाकारांना मद्यधुंद कोर्टरूममध्ये काम करताना दाखवण्यात आले होते ज्यात न्यायालयाचा अवमान झाला आहे.
 
कॉमेडियन कपिल शर्माच्या या शोमध्ये त्याच्याशिवाय सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी, किकू शारदा आणि अर्चना सिंग सारखे कलाकार दिसतात. शोचा नवीन सीझन 21 ऑगस्टपासून प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे.
 

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

दिवाळीच्या सुट्टीत कोकण की महाबळेश्वर? बजेट, प्रवास आणि अनुभवांची तुलना

'रामायण'च्या संगीतासाठी हान्स झिमर यांच्यासोबत काम करण्याबद्दल ए. आर. रहमान यांचा खुलासा

सूरज बडजात्या यांचा 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट २७ नोव्हेंबरला थिएटरमध्ये

'रामायण'च्या संगीतासाठी हान्स झिमर यांच्यासोबत काम करण्याबद्दल ए. आर. रहमान यांचा खुलासा

पुढील लेख
Show comments