शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘बादशाहो’चा फर्स्ट लूक रिलीज

अभिनेता अजय देवगण ‘बादशाहो’च्या त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक  ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि इम्रान हाश्मी स्क्रीन शेअर करणार आहेत. दरम्यान हा फर्स्ट लूक पाहता चित्रपटाचं कथानक १९७५ मध्ये झालेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे अजय आणि इम्रानसोबतच ईशा गुप्ता, इलियाना डिक्रूज, विद्युत जामवाल अशी स्टारकास्ट असूनही चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये एकाही कलाकाराची झलक पाहायला मिळत नाही.