काय आहे 'जी कुत्ता से'
'जी कुत्ता से' हे ऐकायला विचित्र असलं तरी हे एका चित्रपटाचे नाव आहे. हा हिंदी सिनेमा 9 जून रोजी रिलीज होणार आहे. आता या विचित्र टाइटलच्या सिनेमाची कहाणी वाचून घ्या.
ही दिल्लीजवळीक एका लहान गावात प्रेम आणि वासनेभोवती फिरणारी तीन लोकांची कहाणी आहे. दीक्षा आपल्या आई-वडिलांचा सन्मान गमवताना कॅमेर्यात कैद होते. किरण चुकीच्या मुलाच्या प्रेमात पडून एका व्यक्तीच्या प्रतिशोधाचा टार्गेट बनते आणि वीरेन्द्र हा स्त्रियांसोबत वाटेल तसं वागणारा मुलगा आहे.
जी कुत्ता से भारतात ऑनर किलिंग आणि यौन गुन्हाची आंधळी आणि घाणेरडी दुनिया एक्सप्लोर करणारे चित्रपट आहे.
निर्माता: विनोद शर्मा
दिग्दर्शक : राहुल दहिया
कलाकार : राजवीर सिंह, नेहा चौहान, नितिन पंडित, रश्मि सिंह सोमवंशी, संदीप गोयत, विभा दीक्षित, पार्थ शर्मा
रिलीज डेट : 9 जून 2017