गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (15:09 IST)

गेमिंगचा देव हिदेओ कोजिमा यांनी YRF स्पाय युनिव्हर्सच्या टायगर 3 चे कौतुक केले, म्हटले - अविस्मरणीय मनोरंजन!

TIger 3
हिदेओ कोजिमा, जे जगभरात 'गेमिंगचे देव' म्हणून ओळखले जातात, हे एक प्रसिद्ध जपानी व्हिडिओ गेम डिझायनर आहेत. कोजिमाने एका फ्लाइटमध्ये टायगर 3 पाहिली आणि सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.
 
टायगर 3 कोजिमा ला इतकी आवडली की त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले, “फ्लाइटमध्ये मी भारतीय चित्रपट टायगर 3 पाहिला. टायगर 3 खूपच मनोरंजक होता. त्यातील अॅक्शन, पेसिंग, दिग्दर्शन, दृश्ये आणि ध्वनीत 90 च्या दशकातील एक खास नॉस्टॅल्जिक भावना होती. हे मला मोठ्या पडद्यावर पाहायला हवे होते.”
 
हिदेओ यांनी सलमान खानच्या जबरदस्त स्वॅगला आणि पठानच्या एंट्रीला पाहून फ्लाइटमध्ये टाळ्या वाजवल्याचेही सांगितले!
 
ते म्हणाले, “मी पहिल्यांदाच टायगर सिरीज पाहत होतो, पण YRF स्पाय युनिव्हर्स खरोखरच अप्रतिम आहे! आणि पठानला बघायला मिळणे हा एक खास अनुभव होता! फ्लाईटमध्ये टाळ्या वाजवल्या. आता मी पुढील पठान चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे.”
 
हिदेओ यांचा पोस्ट इथे पाहा :
 
आदित्य चोप्रांचे टायगर 3 हे YRF स्पाय युनिव्हर्स मधील पाचवे चित्रपट आहे आणि एक था टायगर आणि टायगर जिंदा है यांचा सीक्वल आहे. स्पाय युनिव्हर्सच्या कथानकानुसार टायगर 3 मध्ये वॉर आणि पठानच्या घटनांच्या पुढील गोष्टी दाखवल्या आहेत. YRF स्पाय युनिव्हर्समधील सर्व पाच चित्रपट प्रचंड हिट ठरले आहेत, ज्यामुळे ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी फ्रँचायझी बनली आहे. यशराज सध्या स्पाय युनिव्हर्समधील दोन नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे – वॉर 2, ज्यात हृतिक रोशन आणि NTR जूनियर असतील, आणि अल्फा, ज्यात आलिया भट्ट आणि शर्वरी असतील. वॉर 2 स्वतंत्रता दिवस ऑगस्ट, 2025 रोजी रिलीज होणार आहे आणि अल्फा 25 डिसेंबर, 2025 रोजी रिलीज होणार आहे.