सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (17:59 IST)

टाइगर 3 स्ट्रीमिंगवरही हिट,त्या वर सलमान खान म्हणाला

टाइगर  3 सह एक गर्जना करणारा थिएटर हिट रेकॉर्ड केल्यानंतर, बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान रोमांचित आहे की चित्रपट आता स्ट्रीमिंगवरही हिट झाला आहे! 7 जानेवारी रोजी जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म,अमेज़ॉन वर  टाइगर 3 प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्यावर  प्रेमाचा पूर आला आहे. टाइगर 3 हा प्रख्यात वाईआरएफ  स्पाय युनिव्हर्सच्या ब्लॉकबस्टर टाइगर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे ज्याने की शंभर टक्के हिट चे यश मिळवले आहे." , ‘लोकांचे मनोरंजन करणे हे माझे सर्वात मोठे आणि एकमेव काम आहे!’ सलमान म्हणतो
 
सलमान म्हणतो, “टाइगर फ्रँचायझीला पहिल्या चित्रपटापासूनच एकमताने प्रेम मिळाले आहे, मग ते थिएटरवर असो, सॅटेलाइटवर किंवा स्ट्रीमिंगवर! त्यामुळे,टाइगर 3 चा तिसरा भाग आधी थिएटरमध्ये आणि आता स्ट्रीमिंगवर कसा हिट झाला हे पाहणे आश्चर्यकारक वाटते!”
 
तो पुढे म्हणतो, “माझ्या सोशल मीडियाद्वारे मी माझ्या प्रेक्षकांच्या जवळच्या संपर्कात आहे आणि टाइगर 3 ओटीटीवर आल्यामुळे  मी आता प्रेमाचा वर्षाव पाहू शकतो. एक अभिनेता म्हणून माझे सर्वात मोठे आणि एकमेव काम लोकांचे उत्तम मनोरंजन करणे हे आहे आणि मला आनंद आहे की टाइगर 3 जगभरातील लोक एन्जॉय करत आहेत.”
 
सलमान पुढे म्हणतो, “टाइगर 3 हा माझ्या हृदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे. त्यामुळे, जेव्हा थिएटरमध्ये हिट झाला तेव्हा ते अत्यंत वैयक्तिक वाटले आणि आता काही दिवसांत स्ट्रीमिंगवर हिट झाला आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी टाइगर सदैव तत्पर असेल.”
 
सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी अभिनीत  वायआरएफ च्या टाइगर 3 ने जगभरात 472 कोटी कमाई करून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला आहे .