रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दंगलच्या प्रचाराचा गीता, बबिताला फटका!

ज्या गीता व बबिता फोगट भगिनींचा संघर्ष दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून देशभरात पोहोचला त्यांनी दुखापतीच्या कारणास्तव प्रो कुस्ती लीगमधून माघार घेतल्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. पण एकीकडे त्यांच्या दुखापतीचे कारण दिले जात असताना दुसरीकडे दंगल सिनेमाच्या प्रचारार्थ वे द्यावा लागत असल्याने त्यांना पुरेसा सराव ‍करता येत नसल्याचेही समोर येत आहे.
उत्तरप्रदेश फ्रँचाईझींनी फोगट भगिनींना आपल्या संघात स्थान दिले होते. या संघाचे नावही लोकप्रिय ठरलेल्या दंगल चित्रपटावरून यूपी दंगल असे ठेवण्यात आले. पण आता फोगट भगिनीच या संघातून खेळण्यास असमर्थ आहेत. गीताला ताप आल्याचे निदान केले जात असून बबिताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
भारतीय कुस्ती महासंघाने म्हटले आहे की, गीता व ‍बबितासाठी पर्यायी खेळाडूंची मागणी यूपी दंगल या संघातर्फे करण्यात आली आहे. 53 किलो वजनी गटात बबिताऐवजी पिंकीचा समावेश करण्यात येणार असून 58 किलो वजनी गटात गीताऐवजी मनीषाला संधी देण्यात येईल. पण मनीषाऐवजी महाराष्ट्राच्या रेश्मा मानेचाही विचार होत आहे. त्यासाठी तिला 58 किलोपर्यंत वजन कमी करण्यास सांगण्यात आले आहे. तसे झाले तर ती गीताऐवजी संघात खेळू शकेल.
 
कुस्ती महासंघातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार गीत आणि बबिता यांनी स्पर्धेतून माघार घेतलेली नाही. त्या आपल्या संघासोबत असतील पण प्रत्यक्ष स्पर्धेत खेळणार नाहीत.