रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (16:51 IST)

आयुष्मानचं ‘टंग ट्विस्टर चॅलेंज’करणने अडखळत पूर्ण केलंय

बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’येत्या १२ जून रोजी ऍमेझॉन प्राईमवरून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारमंडळी घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे आयुष्मान आणि बिग बींनी सोशल मीडियावरून चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे.
 
त्यासाठी त्यांनी बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींना टंग ट्विस्टर चॅलेंज दिलंय. हे टंग ट्विस्टर इतकं कठिण आहे की, स्वतः अमिताभ बच्चनदेखील ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी हे चॅलेंज अभिनेता आयुष्मान खुराना, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या सर्वांना दिलं आहे.
 
अभिनेता आयुष्मान खुराना याने हे चॅलेंज पूर्ण केलं असून पुढे बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता वरुण धवन, अर्जुन कपूर, अभिनेत्री तापसी पन्नू आणि रॅपर बादशाहला दिले आहे.
 
करण जोहरने अडखळत हे चॅलेंज पूर्ण केलंय.
 
पाहूया, चॅलेंज आहे तरी काय?