रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (09:49 IST)

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

Gurucharan Singh Sodhi
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढी ची भूमिका साकारणारा गुरचरण सिंह 22 एप्रिलपासून बेपत्ता होता. शुक्रवारी घरी परतले. अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर हा अभिनेता आज घरी परतला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिल्लीत बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल केली होती. परत आल्यावर सोढीची पोलिसांनी चौकशी केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरणने चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितले की, आपण आपले सांसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासाला निघालो आहे. पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत तो अमृतसर आणि लुधियानासारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये थांबला होता, परंतु नंतर त्याला घरी परतावे असे वाटले आणि ते घरी परत आले.

22 एप्रिल रोजी अभिनेता दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात बसणार होता. मात्र, ते विमानात चढले नाही आणि बेपत्ता झाले . त्याचा फोन नंबर 24एप्रिलपर्यंत ॲक्टिव्ह होता, ज्याद्वारे अनेक व्यवहार झाले, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. तो बेपत्ता झाल्याच्या दिवसापासूनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता पाठीवर बॅग घेऊन चालताना दिसत आहे.

त्याचे वडील हरजीत सिंग यांनी 26 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 365 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. तपासादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सिंग यांची आर्थिक स्थिती चांगली नाही कारण त्यांच्यावर अनेक कर्जे आणि थकबाकी होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण-पश्चिम दिल्लीतील डाबरी येथे असल्याचे आढळून आले, जिथे तो IGI विमानतळाजवळून भाड्याने घेतलेल्या ई-रिक्षामध्ये पोहोचले.
 
बेपत्ता गुरुचरण यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस तारक मेहताच्या उलटा चष्मा मालिकेचा सेट वर गेले होते. तिथे त्यांनी मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहेल रामाणी यांच्याशी विचारपूस केली असता रामाणी म्हणाले, गुरुचरण मला तीन महिन्यापूर्वी एका मॉल मध्ये भेटले होते. आमच्या थोड्याच गोष्टी झाल्या. 
 
 
Edited by - Priya Dixit