गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम',अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.  

या पोस्टरमध्ये श्रद्धा आणि अर्जुन पावसात एकत्र भिजत असून त्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आहेत. या रोमँटिक फोटोमुळे सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. मोहित सूरीने ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चं दिग्दर्शन केलं आहे. 19 मे रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.