सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (11:09 IST)

या अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन

अभिनेता हरमन बावेजाने गेल्या वर्षी मार्चमध्ये न्यूट्रिशनिस्ट साशा रामचंदानीसोबत लग्न केले. आता हरमनच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याची बातमी आहे.
 
रिपोर्ट्सप्रमाणे हरमन त्यांच्या पहिल्या मुलाचे वडिल झाले आहे. त्यांची पत्नी साशाने एका मुलाला जन्म दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
 
जुलैमध्ये बातम्या आल्या होत्या की हरमन आणि साशा डिसेंबरमध्ये पालक होणार आहेत. हे दोघे नेहमीच सोशल मीडिया आणि बातम्यांपासून दूर राहणे पसंत करतात. 
गुप्तरित्या लग्नानंतर या जोडप्याने 21 मार्च 2021 रोजी एका खाजगी समारंभात शीख रितीरिवाजांनुसार लग्न केले. हरमनने प्रियांका चोप्रा स्टारर 'लव्ह स्टोरी 2050' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ते अभिनय सोडून निर्माता म्हणून काम करत आहे.