"मला विविध भाषा आणि लोकांपर्यंत पोहोचायला मिळते आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते." आगामी चित्रपट ‘लायगर’ बाबत अनन्या पांडे ने व्यक्त केल्या भावना.

Last Updated: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (00:49 IST)
‘लायगर’चित्रपटातून अनन्या पांडे चक्क एक दोन नव्हे तर तमिळ, तेलगु मल्याळम आणि कन्नडा अशा चार महत्त्वाच्या
चित्रपट सृष्टीत प्रवेश करत आहे. एका युवा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पैन-इंडिया चित्रपट 'लायगर’ मध्ये अनन्या पांडे घातक शस्त्र आणि धमाकेदार एक्शनमध्ये दिसणार आहे.

यावर आनंद व्यक्त करताना अनन्या पांडे म्हणते की, "नक्कीच! ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या साठी अतिशय उत्साहित आहे. मी दोन वर्षांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीतून सुरुवात केली होती आणि ‘लायगर’च्या निमित्ताने मी इतर चार महत्त्वाच्या चित्रपट सृष्टीत प्रवेश करणार आहे. ही चौपट आनंदाची गोष्ट आहे. त्यासोबतच चौपट धाकधुक देखील आहे जणू पोटात फुलपाखरे उडत असल्याची जाणीव होते आहे. मला वाटते की जग लहान झाले आहे. आपला भारत एक असा देश आहे ज्यामध्ये इतक्या संस्कृति आणि खूप सारे प्रेम सामावले आहे विविध भाषा आहेत आणि सध्या ओटीटीमुळे खूप साऱ्या संधी निर्माण होत आहेत. एक ठराविक अशी सीमाच नाहीये. ‘लायगर’च्या निमित्ताने मला विविध भाषा आणि लोकांपर्यंत पोहोचायला मिळते आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते."

अनन्याला 'लायगर'च्या प्रदर्शनाची घोषणा होण्यापूर्वी आपण तेलुगु मध्ये संवाद साधताना पहिले होते. अनन्या और विजय देवरकोंडा एक ताजी जोड़ी यानिमिताने भेटीला येते आहे आणि हे म्हणणे नक्कीच योग्य ठरेल की दोघांचाही व्यापक फैन बेस आणि लोकप्रियता पाहता ते या शो सोबत चर्चेत आहेत. या दोघांनाही आपण नेहमीच एकमेकांचे कौतुक करताना पाहिले आहे.

पैन-इंडिया प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील सर्वात युवा अभिनेत्रीचा हा आगामी चित्रपट 'लायगर' पुरी जगन्नाथ यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे तसेच, शकुन बत्राच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात अनन्या दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तिकिट सापडत नाहीये

तिकिट सापडत नाहीये
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं

आता काय ब्रेक वेगळा काढून मारु

आता काय ब्रेक वेगळा काढून मारु
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला.

खंडाळा

खंडाळा
खंडाळा हे भारतातील महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक हिल स्टेशन आहे.हे लोणावळा पासून 3 ...

उजव्या हातात मोबाईल

उजव्या हातात मोबाईल
रमा -आई, ऍडमिशन फॉर्म वर ओळख पटण्यासाठीची खूण म्हणून काय लिहू ?

सुरुवात तुमच्या कडून झाली

सुरुवात तुमच्या कडून झाली
गण्याची बायको गण्याला बायको-अहो ! तुम्ही फार भोळे आहात,