गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (13:00 IST)

दोबारामध्ये तापसी

कंटेंट क्वीन एकता कपूर आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उडता पंजाब, लुटेरासारखे सुपरहिट चित्रपट साकारले आहेत. ही जोडी पुन्हा एकत्रित आली असून ते ‘दोबारा'ची निर्मिती करणार आहेत. यात तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारत आहे. निर्मात्यांनी याची एक झलक शेअर करत एक मजेशीर टिझर प्रदर्शित केला आहे, ज्यात तापसी आणि अनुराग दोघेही दिसत आहेत. दोबाराची निर्मिती कल्ट मूव्हिजद्वारा करण्यात येत असून जो एकताच बालाजी टेलिफिल्म्सच्या अंतर्गत एक नवीन डिव्हिजन आहे. 
 
अनुराग कश्यप म्हणाले दोबाराधून नवीन कथा सादर करणार असून यासाठी मी उत्साहित आहे. यात थ्रिलर्स नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तापसी म्हणाली, यात अनोख्या पद्धतीचा थ्रिलर चाहत्यांना अनुभवण्यास मिळणार आहे. यापूर्वी मनमर्जिया, बदला या चित्रपटात अनुराग यांच्यासोबत काम केलेले आहे. या चित्रपटाकडूनही मला अपेक्षा असल्याचे तापसीने सांगितले.